इंद्रध्वज विधानातून आत्मशुद्धीचा संदेश
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): आर्यनंदी कॉलनी, वेदांतनगर येथील १००८ श्री चंद्रप्रभू खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरात आचार्य हेमसागर महाराज यांच्या सान्निध्यात सुरू असलेल्या इंद्रध्वज महामंडल विधानामुळे परिसरात भक्ती, अध्यात्म आणि धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिष्ठाचार्य अकलंक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली विधानाचे धार्मिक विधी भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात सुरू आहेत, अशी माहिती विधानाचे मुख्य सयोजक संजय पापडीवाल यांनी दिली.
६ सप्टेंबर रोजी सकाळी भगवान चंद्रप्रभूच्या शांतिधारेचे
सौभाग्य हर्षा प्रविणकुमार गंगवाल परिवार, जालना यांना लाभले. तसेच आचार्य हेमसागरजी महाराज यांच्या पादप्रक्षालनाचे सौभाग्य शीला संजय, संदेश, रितेश कासलीवाल परिवार यांना मिळाले. सायंकाळच्या आरतीचे सौभाग्य अल्का वर्धमान कासलीवाल परिवार, मुंबई यांना लाभले. या विधानातील प्रमुख पात्रांमध्ये सौधर्म इंद्र दिनेश, निता,
卐
केतन, स्वीटी, कुणाल, निवेदिता सेठी परिवार, ईशान इंद्र पूनमचंद, जयश्री अग्रवाल, यज्ञनायक इंद्र कुंकुमदेवी-संजय, डॉ. अंजली विजय-माधुरी पापडीवाल, शांत इंद्र श्रेणिक सुनिता निखिल-सोनल कासलीवाल, महेंद्र इंद्र शकुंतलादेवी-आनंद. क्षमा, गीता सेठी तसेच एक दिवसीय कुबेर इंद्र हेमलतादेवी-संतोष- रानो सेठी यांचा समावेश आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














